कोरेगाव भीमा येथे रविवारी अर्जुन डांगळे यांची सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरेगाव भीमा येथे रविवारी
अर्जुन डांगळे यांची सभा
कोरेगाव भीमा येथे रविवारी अर्जुन डांगळे यांची सभा

कोरेगाव भीमा येथे रविवारी अर्जुन डांगळे यांची सभा

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : कोरेगाव भीमा येथे शौर्य दिनानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक आणि दलित चळवळीचे अभ्यासक अर्जुन डांगळे यांची एक जानेवारीला जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती सभेचे मुख्य संयोजक ‘रिपब्लिकन जनशक्ती’चे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे यांनी दिली. गेली दोन वर्षे कोरोनामुळे येथे जाहीर सभा घेण्यास बंदी होती. दोन वर्षांनंतर देशभरातून कोरेगाव भीमा येथे लाखो कार्यकर्ते आणि महिला येणार आहेत. या सभेस व्याख्याते सचिन तायडे, आशुतोष भोसले, सिद्धार्थ मोरे उपस्थित राहणार आहेत. तसेच, शौर्य दिनानिमित्त पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते कोरेगाव भीमा यादरम्यान दुचाकी रॅलीचे आयोजन केले आहे. या सभेस नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मोरे यांनी केले आहे.