अफवा पसरविणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अफवा पसरविणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई
अफवा पसरविणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

अफवा पसरविणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : नागरिकांची सुरक्षितता तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ३० डिसेंबर रोजी मध्यरात्रीपासून दोन जानेवारी रोजी मध्यरात्रीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. तसेच, अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
पुणे शहरासह ग्रामीण भागात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यानुसार कोणतीही व्यक्ती इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक आदी समाजमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरविणारे खोटे संदेश आणि माहिती पोस्ट करणार नाहीत. तसेच, फॉरवर्ड करणार नाहीत याची जबाबदारी संबंधित पोस्ट करणारी व्यक्ती आणि ग्रुप ॲडमिनची असेल. शहर आयुक्तालयामधील गावांमध्ये स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या लेखी परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास प्रतिबंध राहील. यात सरकारी यंत्रणांना सवलत राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.