वसतिगृहासाठी ८८ कोटी रुपये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसतिगृहासाठी ८८ कोटी रुपये
वसतिगृहासाठी ८८ कोटी रुपये

वसतिगृहासाठी ८८ कोटी रुपये

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी नायडू रुग्णालयाच्या आवारात ८८ कोटी रुपये खर्च करून वसतीगृह बांधले जाणार आहे. दरम्यान याच आवारात महाविद्यालयाची इमारत बांधण्यास मान्यता दिली असून, त्यासाठी १४७ कोटीच्या खर्च येणार आहे.
पुणे महापालिकेने गेल्यावर्षी वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले. या महाविद्यालय मंगळवार पेठेत सणस शाळेत चालविले जात आहे. तर विद्यार्थ्यांना कमला नेहरू रुग्णालयात प्रॅक्टिकल शिकवले जात आहेत. तर त्यांची निवासाची व्यवस्था ही सणस क्रीडांगण येथील वसतीगृहात करण्यात आलेली आहे. यंदाच्या वर्षी १०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहे. आता पुढच्या वर्षी आणखी १०० विद्यार्थी प्रवेश घेतील. म्हणजे पुढच्या शैक्षणिक वर्षात महापालिकेला २०० विद्यार्थ्यांची व्यवस्था करावी लागणार आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात वैद्यकीय महाविद्यालय उभारले जावे यासाठी नायडू रुग्णालय बाणेर येथे स्थलांतरित केले जाईल. या जागेतील इमारत पाडून टाकून तेथे मोठे रुग्णालय बांधले जाणार आहे. तेथेच वसतिगृह उभारले जाईल. हे बांधकाम स्वतः महापालिका करणार आहे, असे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

१०८ कोटींच्या खर्चास मान्यता
वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी झाली. त्यामध्ये पुढील शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासंदर्भात चर्चा करण्यात पुढील वर्षी विद्यार्थी संख्या वाढणार असल्याने खर्चातही वाढ होईल. त्यामुळे पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात १०८ कोटींची तरतूद केली जाणार आहे. महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन अयोग्य लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आयुक्त कुमार यांनी दिली.

विद्यार्थ्यांना इतर रुग्णालयातही संधी
पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालय कमला नेहरू रुग्णालयाशी संलग्न आहे. पण येथे विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार कमी रुग्ण व सेवा आहेत. त्यांना पुरेसा अनुभव मिळावा यासाठी शहरातील खासगी रुग्णालयाशी करार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.