‘मुस्लिम चेंबर ऑफ कॉमर्स’च्या वतीने कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मुस्लिम चेंबर ऑफ कॉमर्स’च्या वतीने कार्यक्रम
‘मुस्लिम चेंबर ऑफ कॉमर्स’च्या वतीने कार्यक्रम

‘मुस्लिम चेंबर ऑफ कॉमर्स’च्या वतीने कार्यक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ : ‘‘पारंपरिक बँकिंग व्यवस्था काहीशी किचकट असून योग्य व्यक्तींनादेखील अर्थपुरवठा नीट होत नाही. शरियातील बिनव्याजी कर्ज हे प्रामाणिक व गरजू व्यक्तींना कमीत कमी कागदपत्रांद्वारे मिळाल्यास तसेच यात अर्थपुरवठा हा भागीदारी तत्त्वाने झाल्यास असंख्य गरजू उद्योजकांना लाभ होईल, म्हणजेच धनिकांचा पतपुरवठा व कुशल उद्योजक यांची भागीदारी झाल्यास समाजाची तसेच देशाची प्रगती होईल,’’ असे मत ‘नमो जैन ग्रुप’चे संजय जैन यांनी केले. ‘मुस्लिम चेंबर ऑफ कॉमर्स’च्या वतीने आयोजित ‘पतपुरवठा-नफा नुकसान भागीदारीप्रमाणे शरिया आधारित’ या विषयी ते बोलत होते. पूना क्लब येथील सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी मुस्लिम चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष निसार सागर, उपाध्यक्ष नासिर शेख, सचिव जावेद सय्यद आणि मोहन खटावकर यांच्यासह मुस्लिम उद्योजक उपस्थित होते.