नद्या पुनरुज्जीवित केल्यास पाण्याची वणवण थांबेल ज्येष्ठ पुरातत्त्व व मूर्तिशास्त्राचे तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांचे प्रतिपादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नद्या पुनरुज्जीवित केल्यास पाण्याची वणवण थांबेल
ज्येष्ठ पुरातत्त्व व मूर्तिशास्त्राचे तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांचे प्रतिपादन
नद्या पुनरुज्जीवित केल्यास पाण्याची वणवण थांबेल ज्येष्ठ पुरातत्त्व व मूर्तिशास्त्राचे तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांचे प्रतिपादन

नद्या पुनरुज्जीवित केल्यास पाण्याची वणवण थांबेल ज्येष्ठ पुरातत्त्व व मूर्तिशास्त्राचे तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांचे प्रतिपादन

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ : ‘‘पाच हजार वर्षांपूर्वी लुप्त झालेल्या सरस्वती नदीच्या शोध मोहिमेला जगदीश गांधी यांनी वैज्ञानिक दृष्टी दिली व अखंड परिश्रमातून सरस्वती नदीचे पंचवीस किलोमीटर पात्र पुनरुज्जीवित केले. अशा प्रकारे भारतातील सर्व नद्यांबाबत काम केल्यास आपल्या देशातील पाण्यासाठीची वणवण संपेल,’’ असा विश्वास पुरातत्त्व व मूर्तिशास्त्राचे तज्ज्ञ यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र विकास केंद्र या संस्थेच्या दहाव्या जलमित्र पुरस्काराचे वितरण नुकतेच झाले. या वेळी श्री सरस्वती हेरिटेज संस्थेचे अध्यक्ष व नदी अभ्यासक जगदीश गांधी यांना डॉ. देगलूरकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी डॉ. विजय परांजपे, ‘वनराई’चे रवींद्र धारिया आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

डॉ. देगलूरकर म्हणाले, ‘‘आपली संस्कृती सिंधू नसून ती सरस्वती संस्कृती म्हणजेच जगातील सर्वांत जुनी संस्कृती आहे. हीच खरी भारतीय संस्कृती समजले जाते. सरस्वती नदीच्या काठावरील चौदाशे प्राचीन स्थाने व अनेक ऐतिहासिक मानवी संस्कृतीस्थळे असून सरस्वती नदीचे महत्त्व असाधारण आहे.’’ डॉ. परांजपे म्हणाले, ‘‘कोणत्याही कामात नैसर्गिक आणि कृत्रिम अडचणी येतात. पण सुंदर कामाची केवळ प्रशंसा न करता येणाऱ्या बदलांचा विचार करून प्रयत्न सुरू ठेवावेत. हिमालयातील हिमनग वितळणार असल्याने पुढील २५ ते ३० वर्षांत पाणी वाढत जाणार आहे. त्यामुळे सरस्वतीच्या पुनरुज्जीवनाला मोठा फायदा होईल.’’ पडीक जमीन आणि रोजगाराचा प्रश्न यांचा समन्वय साधला तर आपल्या देशाचा हात कुणीही धरणार नाही, असे मत धारिया यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी प्रास्ताविक केले, प्रा. प्रदीप कदम यांनी सूत्रसंचालन केले तर सुनील जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.