कोरेगाव भीमा येथे जाण्यासाठी राज्यभरातील ७० जणांना बंदी समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांनाही नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरेगाव भीमा येथे जाण्यासाठी
राज्यभरातील ७० जणांना बंदी
समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांनाही नोटीस
कोरेगाव भीमा येथे जाण्यासाठी राज्यभरातील ७० जणांना बंदी समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांनाही नोटीस

कोरेगाव भीमा येथे जाण्यासाठी राज्यभरातील ७० जणांना बंदी समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांनाही नोटीस

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ : पुण्यासह राज्यातील ७० जणांना रविवारी १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच समाजामध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्या चौघांना नोटीस बजावण्यात आली आहे. अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले.

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखो अनुयायी येतात. याबाबत पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तयारीची माहिती फुलारी यांनी दिली. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल उपस्थित होते.

कोरेगाव भीमा येथे होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठीची पूर्ण केली आहे. परिसरातील गावांमध्ये शांतता कमिटीच्या बैठका घेण्यात आल्या. यापूर्वीच्या गुन्ह्यांमधील संशयित आरोपींकडून कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी अशा ७० जणांना १४४ कलमानुसार येथे येण्यास बंदी घातली आहे. संबंधित पोलिस घटकांमार्फत नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यानंतरही संबंधित व्यक्ती आल्या, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे फुलारी यांनी स्पष्ट केले.

शौयदिनानिमित्त समाजामध्यमांवर कोणत्याही स्वरूपाचा आक्षेपार्ह मजकूर टाकू नये, यासाठी सायबर पोलिसांकडून समाजमाध्यमांवर २४ तास लक्ष ठेवण्यात येणार आहे.

असा आहे ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त
- पोलिस अधीक्षक - ७
- विभागीय पोलिस अधिकारी - १८
- पोलिस निरीक्षक - ६०
- सहायक पोलिस निरीक्षक - १८०
- राज्य राखीव पोलिस दलाच्या कंपन्या - ४ कंपन्या
- गृहरक्षक दलाचे जवान - १ हजार

‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ची कारवाई कडक करणार
पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील लोणावळा, पौड परिसरात नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे-मुंबईसह राज्यभरातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे परिसरात अनेकदा वाहतूक कोंडी होते. मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्यांमुळेही अपघात घडतात. त्यामुळे ग्रामीण पोलिसांकडून नाकाबंदी करून कारवाई करण्यात येते आहे. लोणावळा येथे बंदोबस्त तैनात करण्यात केला असून, अवैध धंद्यांवर यापूर्वीच कारवाई सुरू केली असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले.