‘वैचारिक मंथनातून अदृश्य रेषा दृश्य स्वरूपात आणणे शक्य : वारुंजीकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘वैचारिक मंथनातून अदृश्य रेषा दृश्य स्वरूपात आणणे शक्य : वारुंजीकर
‘वैचारिक मंथनातून अदृश्य रेषा दृश्य स्वरूपात आणणे शक्य : वारुंजीकर

‘वैचारिक मंथनातून अदृश्य रेषा दृश्य स्वरूपात आणणे शक्य : वारुंजीकर

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : ‘‘कायद्याची लक्ष्मणरेषा आखण्यासाठी वेगवेगळ्या न्याय निवाड्यांचा अभ्यास करावा लागेल. मात्र त्यासाठी कायदे विचारवंतांची वानवा आहे. याकरिता हा विषय अभ्यासक्रमात हवा. त्यातून ठोस वैचारिक मंथन होईल व त्यानंतर अदृश्य रेषा दृश्य स्वरूपात आणता येणे शक्य होईल,’’ असे मत उच्च न्यायालयातील वकील उदय वारुंजीकर यांनी व्यक्त केले.
‘पुणे श्रमिक पत्रकार संघा’च्या वतीने ‘डिफेमेशन, कंटेम्प्ट आणि बातमीदारी’ या विषयावर ‘वार्तालाप’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी वारुंजीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट यावेळी उपस्थित होते. ॲड. वारुंजीकर म्हणाले, ‘‘न्यायव्यवस्थेच्या उद्देशाबद्दल शंका उपस्थित करणे किंवा विरोधी भूमिका घेणे यास न्यायालयाचा अवमान मानला जातो. वृत्तपत्रे आणि दृकश्राव्य माध्यमांकडून बऱ्याचदा अज्ञानापोटी चुकीची माहिती प्रसारित होते. यामुळे पत्रकारांवर न्यायालयाचा अवमान केल्याचे खटले दाखल होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. हे थांबविण्यासाठी माध्यमांनी सत्य व अचूक वार्तांकन करावे.’’