थकबाकीमुळे तुळशीबागेतील स्टॉल बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थकबाकीमुळे तुळशीबागेतील स्टॉल बंद
थकबाकीमुळे तुळशीबागेतील स्टॉल बंद

थकबाकीमुळे तुळशीबागेतील स्टॉल बंद

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : तुळशीबागेतील व्यावसायिकांनी गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेचे शुल्क न भरल्याने या विरोधात आज (ता. १९) अतिक्रमण विभागाने कारवाई केली. या ठिकाणच्या सुमारे सव्वादोनशे व्यावसायिकांना शुल्क भरल्याशिवाय दुकाने सुरू करता येणार नाहीत असे बजावले. त्यानंतर ९५ जणांनी २० ते ४० हजार रुपये रक्कम भरून दुकाने सुरू केली.

तुळशीबागेत २२१ स्टॉलधारक आहेत. गेल्या चार वर्षांपासून त्यांनी महापालिकेचे शुल्क भरले नसल्याने ही थकबाकी चार कोटींच्याजवळ गेली होती. कोरोनाच्या काळातील २२० दिवसांचे शुल्क माफ केल्याने प्रत्येकाला १ लाख ३७ हजार रुपये शुल्क भरणे आवश्‍यक होते. वारंवार पाठपुरावा करूनदेखील व्यावसायिक शुल्क भरण्यास टाळाटाळ करत असल्याने ही थकबाकीची रक्कम ३ कोटी पेक्षा जास्त झाली आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी सकाळी तुळशीबागेत जाऊन थकबाकी भरल्याशिवाय दुकान सुरू करता येणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यावेळी व्यावसायिकांनी मुदत मागितली असता प्रशासनाने तुम्ही शुल्क भरा आणि व्यवसाय सुरू करा अशी सूचना दिली. पण तरीही अनेकांनी पैसे भरण्यास नकार दिला. अखेर दुकाने बंद केल्यानंतर २२१ जणांपैकी दिवसभरात ९५ जणांनी काही प्रमाणात थकबाकी भरली. काही जणांनी २० हजार तर काही जणांनी ४० हजार रुपये रक्कम भरली आहे. उर्वरित रक्कम भरण्यासाठी काही दिवसांची मुदत मागितली आहे, अशी माहिती उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.