‘ईएमई’चा वर्धापन दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ईएमई’चा वर्धापन दिन उत्साहात
‘ईएमई’चा वर्धापन दिन उत्साहात

‘ईएमई’चा वर्धापन दिन उत्साहात

sakal_logo
By

पुणे, ता. १५ ः सैन्यदलाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअर्स (ईएमई) कोअरचा ८० वा वर्धापन दिन शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी दक्षिण मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लष्करी उपकरणांची देखभाल योग्यरीत्या करण्यासाठी ईएमई कोअरचे त्यांनी कौतुक केले. तसेच, भविष्यातही अशाच प्रकारची सेवा कार्य सुरू ठेवण्याचे आवाहन केले. सैन्यदलाच्या यादीत असलेल्या उपकरणांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी महत्त्वपूर्ण जबाबदारी ईएमईद्वारे पार पाडली जाते. १९४३ मध्ये ईएमईची स्थापना झाल्यापासून या ईएमईने सर्व प्रयत्नांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तांत्रिक चातुर्य आणि अनुकरणीय व्यावसायिकता या आधारावर ईएमई सातत्याने कार्यरत आहे.