
एकविसावे शतक ‘डेटा’चे
एकविसावे शतक हे डेटाद्वारे चालवले जात आहे आणि खरे तर ते या तंत्रज्ञानाच्या युगातील शरीरात वाहणारे ‘रक्त’ बनत आहे. जागतिक रंगमंचावरील डेटाची वाढ हे भाकीत करते की हे क्षेत्र आगामी वर्षांसाठी जगावर हुकूमत गाजवणार आहे. याचे सर्व श्रेय आयओटी, डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म आणि स्मार्टफोनला जाते.
डेटा सायन्सच्या भविष्यातील कार्यक्षेत्रांबद्दल बोलत असताना, एरिक श्मिट म्हणतात, ‘‘संपूर्ण मानवी सभ्यता केवळ ४८ तासांत इतक्या मोठ्या प्रमाणावर डेटा तयार करत आहे की त्याची तुलना मानवी सभ्यतेच्या सुरुवातीपासून १५ वर्षांपूर्वीपर्यंतच्या डेटाशी केली जाते.’’
रेकमेंडेशन इंजिन डेटा सायन्समधील सर्वात प्रचलित वापरांपैकी एक आहे. बहुतेक लोकांच्या लक्षात आले असेल की शॉपिंग साइट्स किंवा ऑनलाइन मालिका वेबसाइट्स अनेकदा एखाद्याच्या पूर्वीच्या आवडीनुसार मालिका किंवा उत्पादनांची शिफारस करतात.
डेटा शास्त्रज्ञ हेच करतात. अल्गोरिदम आणि ग्राहक वर्तनाच्या मदतीने व साहाय्याने, ते कस्टमाइझ्ड रेकमंडेशन चार्ट तयार करण्यासाठीचे व्यवस्थापन करतात. आजच्या परिस्थितीत, डेटाचे प्रचंड प्रमाण हे डेटा विश्लेषणासाठी भविष्यातील मोठ्या संधींना जन्म देत आहे.
अधिक माहितीसाठी क्यूआर कोड स्कॅन करा.----------७५०६७
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j23960 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..