पुण्यात पाच ठिकाणी घरफोड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात पाच ठिकाणी घरफोड्या
पुण्यात पाच ठिकाणी घरफोड्या

पुण्यात पाच ठिकाणी घरफोड्या

sakal_logo
By

पुणे, ता. २ : शहरातील विविध भागांत झालेल्या पाच घरफोड्यांत चोरट्यांनी तब्बल ११ लाख ३७ हजार ७५० रुपयांचा ऐवज चोरी केला. बंद सदनिकांना चोरट्यांकडून टार्गेट करण्यात येते आहे.

पहिली घटना संभाजीनगर, कदमाकवस्ती येथे घडली. व्यावसायिक सुहास बोरकर यांच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड, सोन्या-चांदीचे दागिणे असा सहा लाख ६४ हजारांचा ऐवज चोरी केला. बोरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी घडली. गेल्या आठवड्यात बिबवेवाडी परिसरातील एका व्यावसायिकाच्या घरातदेखील चोरट्यांनी गॅलरीचे गज तोडून चोरी केली होती.
दुसऱ्या घटनेत लुल्लानगर वानवडी येथील जग्गू तलाठी यांच्या घराचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी लॉकरमधील तीन लाखांची रोकड चोरली. याप्रकरणी तलाठी यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तिसरी घटनेत एमआयबीएम रोड, कोंढवा खुर्द येथे घडली. एका सदनिकेत चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्यांनी सदनिकेच्या सेफ्टी दरवाजाचे लॉक व आतील लाकडी दरवाज्याचे लॅच तोडून पाच हजार रुपयांचे नुकसान केले. हा प्रकार लक्षात येताच सदनिका मालक लतिका माथूर यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
चौथी घटना ही काकडेवस्तीत घडली. घराचे रंगकाम सुरू असल्यामुळे बेडरूमधील कपाटात ठेवलेले २१ हजारांचे सोन्याचे दागिणे चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी संतोष दिवेकर यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना काकडेवस्ती माजी सैनिक निवासस्थानाच्या जवळ कोंढवा बु. येथे घडली आहे.
पाचवी घटनेत काळेपडळ येथील गजानन कोठावळे यांच्या सदनिकेचे लॉक तोडून चोरट्यांनी सोने-चांदी व रोकड, असा एक लाख ४७ हजारांचा ऐवज चोरी केला. याप्रकरणी कोठावळे यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j24062 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top