
रेल्वेमंत्र्यामळे रेल्वे पुण्यापर्यंत; वेळ व क्रमांक दोन्ही बदले हडपसर-नांदेड एक्स्प्रेस दररोज धावणार
पुणे, ता.२ ः पुणे स्थानकावर फलाट उपलब्ध नसल्याचे सांगत रेल्वे प्रशासनाने हेद्राबाद-हडपसर एक्सप्रेसला पुणे स्थानकावर घेण्यास नकार दिला. मात्र, व्हाया जालना धावणाऱ्या नांदेड-हडपसर एक्सप्रेसला पुण्यात फलाट उपलब्ध करून दिले आहे. ५ जुलैपासून ही गाडी दररोज धावणार आहे. रेल्वे राज्यमंत्र्यांच्या सूचनेवरून हा बदल केला आहे. आता या रेल्वेची वेळ व क्रमांक दोन्ही बदलण्यात आले. यातून रेल्वेच्या दुटप्पीभूमिका समोर येते.
नांदेड-हडपसर एक्स्प्रेस ही आधी आठवड्यातून दोन दिवस धावत होती. ती आता दररोज धावणार आहे. ज्या वेळी हडपसर -हेद्राबाद एक्स्प्रेस सुरू झाली, तेव्हा देखील प्रवाशांच्या सोयीसाठी ही रेल्वे पुणे स्थानकावरून सोडण्याची मागणी केली होती. त्यावेळी रेल्वे प्रशासनाने पुणे स्थानकावर फलाट उपलब्ध नसल्याचे कारण देत, या गाडीस पुणे स्थानकावरून सोडण्यास नकार दिला. आता हडपसर स्थानकावर फारशा सुविधा नसताना व तेथे जाणे हे गैरसोयीचे असताना देखील प्रवाशांना हडपसर स्थानकावरूनच गाडी पकडावे लागते आहे. मात्र, नांदेड एक्सप्रेसच्या प्रवाशांचे भाग्य थोर आहे. त्यांच्या पाठीमागे थेट रेल्वे राज्यमंत्री असल्यानेच ही गाडी आता पुणे स्थानकावरूनच सुटणार आहे.
-----------------
ही आहे वेळ :
१७६३० ही रेल्वे नांदेड येथून दररोज दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी निघेल. पुण्याला पहाटे साडेपाच वाजता पोहोचेल.
१७६२९ ही रेल्वे पुण्यातून दररोज रात्री ९ वाजून ३५ मिनिटांनी धावेल. नांदेडला दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. गाडीला पूर्णा, परभणी सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन आदी स्थानकांवर थांबा देण्यात आला.
हडपसर स्थानकावर प्रवासी सुविधा नाही. त्याचा विकास नाही. प्रवाशांना येण्यासाठीच रस्ता नाही, असे असताना प्रवाशांना नाइलाजास्तव हडपसर स्थानकावर जावे लागत आहे. तर दुसरीकडे नांदेड एक्सप्रेसला पुण्यात फलाट उपलब्ध नसताना देखील केवळ रेल्वेमंत्र्यांच्या मतदार संघातील नागरिकांना खूष करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
- हर्षा शहा, रेल्वे प्रवासी ग्रुप, अध्यक्षा.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j24101 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..