‘लोकमान्य’तर्फे सीए, डॉक्टरांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘लोकमान्य’तर्फे सीए, डॉक्टरांचा सन्मान
‘लोकमान्य’तर्फे सीए, डॉक्टरांचा सन्मान

‘लोकमान्य’तर्फे सीए, डॉक्टरांचा सन्मान

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : आर्थिक आणि आरोग्य क्षेत्रात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सीए आणि डॉक्टर हे दोघेही देशसेवा व मानवसेवेचा आदर्श समाजासमोर घालून देत आलेले आहेत. त्यांच्या या कार्याला मानवंदना म्हणून पुणे महानगराबरोबरच सातारा, वाई, उंब्रज, कऱ्हाड, नगर, औरंगाबाद येथील कार्यरत असणाऱ्या सीए व डॉक्टरांचा सन्मान लोकमान्य सोसायटीच्या वतीने करण्यात आला. ‘सीए व डॉक्टर्स डे’निमित्त एक जुलै रोजी लोकमान्य सोसायटीच्या विविध शाखांतर्फे त्यांच्या निवासस्थानी जाऊन हा सत्कार करण्यात आला. लोकमान्य सोसायटीच्या ४५ हून अधिक शाखांच्या माध्यमातून पाचशे सीए व डॉक्टर्स यांना पुस्तकांचा संच आणि सन्मानपत्र देण्यात आले. सन्मानमूर्तींनी लोकमान्य सोसायटीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. या सन्मानामुळे आम्हाला पुढील कार्यासाठी प्रेरणा मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j24919 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top