
कोथरुडमधील गुंड शरद मोहोळ तडीपार
पुणे, ता. ५ : कोथरूड भागात दहशत पसरवीत असलेला गुंड शरद मोहोळला शहरातून तडीपार करण्याचे आदेश पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी दिला.
मोहोळ (वय ३८, रा. माऊलीनगर, सुतारदरा, कोथरूड) याच्या विरोधात पुणे शहर, पिंपरी तसेच ग्रामीण भागात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. टोळीयुद्धातून गणेश मारणे टोळीतील पिंटू मारणे याचा खून नीलायम चित्रपटगृहाजवळ एका हॉटेलमध्ये शरद मोहोळ आणि साथीदारांनी केला होता. या गुन्ह्यात न्यायालयाने मोहोळला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मोहोळला गेल्यावर्षी जामीन मंजूर केला होता. कारागृहाबाहेर आल्यानंतर मोहोळ आणि साथीदारांनी दहशत गाजविण्याचे गुन्हे केले होते. मोहोळला शहरातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचा प्रस्ताव कोथरूड ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब बडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी भास्कर बुचडे, अजय सावंत, अनिल बारड यांनी तयार केला.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j24973 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..