‘वनराई’च्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘वनराई’च्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी प्रदर्शन
‘वनराई’च्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी प्रदर्शन

‘वनराई’च्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी प्रदर्शन

sakal_logo
By

‘वनराई’च्या वर्धापन दिनानिमित्त
रविवारी पर्यावरणविषयक प्रदर्शन
पुणे, ता. ५ : वनराई संस्थेच्या ३६व्या वर्धापनदिनानिमित्त ‘ग्रामीण पर्यावरणपूरक जीवनशैली’ या संकल्पनेवर आधारित विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या आवारात पर्वती येथील मित्र मंडळ चौक येथे रविवारी (ता. १०) सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल. यात सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे, भूजल विषयक विविध मॉडेल व माहितीपर पोस्टर, बायोगॅस, बांबूची सायकल, परसबागेत, छतावर व बाल्कनीत विविध प्रकारच्या वनस्पतींची लागवड करण्यासाठी मार्गदर्शन व त्याबाबतची उत्पादने आदींचा समावेश असेल. तसेच ‘आयुष आपके द्वार’ मोहीमेंतर्गत केंद्र सरकारच्या ‘आयुष मंत्रालया’चे राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्रातर्फे सर्व नागरिकांना वनौषधी रोपांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
----------
‘दलित पँथर’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त गौरव सोहळ्याचे आयोजन
पुणे, ता. ५ ः ‘दलित पँथर’ या चळवळीला येत्या ९ जुलैला ५० वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्ताने रिपब्लिकन युवा मोर्चातर्फे दलित पँथरसाठी योगदान देणाऱ्या व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या गौरव सोहळ्याचे आयोजन केले आहे. या वेळी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ पत्रकार मधू कांबळे, रिपब्लिकन नेते तालसेन ननावरे, ज्येष्ठ विचारवंत रोहिदास गायकवाड, ‘दलित पँथर’चे नानासाहेब भालेराव आदी उपस्थित राहणार आहेत. भवानी पेठेतील सावित्रीबाई फुले सभागृहात हा कार्यक्रम होणार असून या वेळी दलित पँथर या चळवळीविषयी विचारमंथन करण्यात येणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक राहुल डंबाळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
-------------
पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाचे सोपे रुप प्रसिद्ध
पुणे, ता. ५ : स्थानिक स्वराज्य संस्थांचे अर्थसंकल्प आपल्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारे असले, तरी त्यांच्या मांडणीच्या क्लिष्टतेमुळे नागरिकांचे त्याकडे दुर्लक्ष होते. हे टाळण्यासाठी ‘पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन’तर्फे (पीआरओ) अर्थसंकल्पाचे सोपे रुप प्रसिद्ध करण्याचा उपक्रम राबवला जातो. या अंतर्गत पुणे महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पाचे सोपे रुप प्रसिद्ध करण्यात आले असून http://citybudget.info/ या संकेतस्थळावर ते उपलब्ध आहे. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेचे सहकार्य या उपक्रमाला लाभले असल्याची माहिती ‘पीआरओ’च्या संचालक नेहा महाजन यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j24982 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top