
''सत्य व असत्य यातील भेद निर्भीडपणे दाखवा''
पुणे, ता. ५ : ''''देश संभ्रमित व गोंधळलेल्या अवस्थेत असताना लेखक, कलावंतांनी या विरोधात स्पष्ट भूमिका घेऊन आवाज उठवला पाहिजे. सत्य व असत्य यातील भेद समाजाला निर्भीडपणे दाखवण्याची जबाबदारी ही लेखक, कलावंतांनी स्वीकारावी,'''' असे आवाहन मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी केले.
दलित स्वयंसेवक संघ व अण्णा भाऊ साठे स्मारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३४८ व्या व्याख्यानमालेत सासणे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ‘‘देशातील नागरिकांचे बेरोजगारी, महागाई यासारखे महत्त्वाचे प्रश्न आहेत. पण जनतेला भ्रमिष्ट करून जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत. ही शोकांतिका आहे. याविरोधात सामूहिक लढा उभारला पाहिजे. म्हणूनच माणूसकेंद्री साहित्य लेखन आवश्यक आहे.’’
यावेळी माजी संघप्रमुख दादासाहेब सोनवणे, साहित्यिक बाळ भारस्कर, सुरेश पाटोळे, डॉ मधुकर खेतमाळस, सुभा लोंढे, अशोक खंदारे, हनुमंत क्षीरसागर, डॉ.खुणे त्रिभुवन, दीपिका खोतकर, प्रा. दिलीप लोखंडे, प्रा.सुहास नाईक, प्रा. विनोद सूर्यवंशी, सचिन जोगदंड, संतोष माने, संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण लोंढे, अण्णा शेंडगे आदी उपस्थित होते.
संविधान उद्देशिका डॉक्टर सुहास नाईक यांनी वाचन केले. संघ प्रमुख राजू धडे यांनी प्रस्ताविक तर साहेबराव खंडाळे यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j24990 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..