पावसाळ्यातील आजारांपासून राहा सावध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाळ्यातील आजारांपासून राहा सावध
पावसाळ्यातील आजारांपासून राहा सावध

पावसाळ्यातील आजारांपासून राहा सावध

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : शहरात पावसाला सुरवात झाली आहे. या वातावरणामुळे साथरोगाबरोबरच पोटदुखीचे विकार वाढतात. सध्या दिवसभर पडत असलेल्या पावसामुळे गरमा-गरम भजी, वडापाव असे चमचमीत पदार्थ खाण्यावर पुणेकर ताव मारताना रस्त्यारस्त्यांवर दिसत आहेत. हे खाताना खाद्य पदार्थ विक्रेत्याच्या दुकानातील स्वच्छता, त्याची वैयक्तिक स्वच्छता याकडे बघा, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

डॉक्टरांचा सल्ला
- पाणी उकळून पिणे
- वारंवार हात धुणे
- उघड्यावरचे अन्नपदार्थ टाळणे

कोणते आजार डोके वर काढतात?
- कावीळ आणि टायफॉईड यांसारख्या जलजन्य आजार
- पोटदुखी, हगवण,
- उलट्या, ताप

पावसाळ्यात का वाढतात आजार?
- दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार होतात
- हवेतील आर्द्रता वाढल्याने जंतूंच्या वाढीस पोषक वातावरण
- डेंग्यू, हिवताप, चिकनगुणिया अशा किटकजन्य आजारांचे प्रमाण वाढते. स्वच्छ पाण्यावर डासांची पैदास झाल्याने रुग्ण संख्या वेगाने वाढते
- अन्न दूषित होण्याचा धोका जास्त. असे पदार्थ खाण्यात आल्याने आजाराचा धोका

हे आवर्जून करा
- कोणताही पदार्थ खाण्याआधी हात धुवा
- कार्यालय, घर, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता ठेवा
- खाण्यापूर्वी कच्च्या भाज्या, फळे स्वच्छ धुवून घ्या

पावसाळ्यात अन्न पदार्थ तयार करताना वापरले जाणारे पाणी पिण्यास योग्य आहे, याची खात्री करा. दूषित पाणी वापरात आल्यास त्याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होण्याचा धोका असतो. तसेच, खाद्य पदार्थ झाकून ठेवा. पावसाळी वातावरणामुळे अन्न पदार्थांवर माश्या बसून ते पदार्थ दूषित होण्याची शक्यता असते. याचा विचार करून अन्न व्यावसायिकांनी काटेकोर दक्षता घ्यावी.
- संजय नारागुडे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग.

पावसाळा सुरू होताच पोटाच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सामान्य औषधे देऊन रुग्ण तीन ते चार दिवसांमध्ये बरे होत आहेत. यात लहान मुले आणि महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्या खालोखाल चाळीशीच्या व्यक्तींचा समावेश होतो. उघड्यावरचे खाद्य पदार्थ खाणे, हा या पोटाच्या तक्रारीमधील समान दुवा असल्याचे दिसते.
- डॉ. प्रज्ञा जाधव, वैद्यकीय तज्ज्ञ

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j25021 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..