अवैध अपसंपादा जमविल्यप्रकरणी उपायुक्तासह पत्नीवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवैध अपसंपादा जमविल्यप्रकरणी उपायुक्तासह पत्नीवर गुन्हा दाखल
अवैध अपसंपादा जमविल्यप्रकरणी उपायुक्तासह पत्नीवर गुन्हा दाखल

अवैध अपसंपादा जमविल्यप्रकरणी उपायुक्तासह पत्नीवर गुन्हा दाखल

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : तब्बल एक कोटी रुपयांची अवैध अपसंपदा जमविल्याप्रकरणी पुणे महानगर पालिकेच्या उपायुक्तांसह त्यांच्या पत्नीवर कोथरूड पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) गुन्हा मंगळवारी (ता. ५) दाखल केला आहे.
उपायुक्तांच्या घराची मंगळवारी सकाळपासून झाडाझडती सुरू होती. महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त विजय भास्कर लांडगे (वय ४९) त्यांच्यासह त्यांच्या पत्नी शुभेच्छा लांडगे (वय ४३) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक भारत साळुंखे यांनी तक्रार दिली होती.
लांडगे आणि त्यांच्या पत्नीने तब्बल एक कोटी २ लाख ६० हजार रुपयांची अपसंपदा जमवल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाने याची तपासणी केली असता त्यात तथ्य आढळले. सर्व खात्री झाल्यावर लांडगे यांनी तब्बल ३१ टक्के अपसंपदा पत्नीच्या नावे जमा केल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. एसीबीचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली. या गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधिक्षक शीतल घोगरे करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j25047 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top