
पाच मिनिटांच्या प्रवासासाठी ५० मिनीट
पुणे, ता. ५ : नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्त्यावरील राजाराम पूल ते भा. द. खेर (संतोष हॉल) चौकापर्यंतचा मोटारीतून जेमतेम पाच मिनिटांचा प्रवास. पण, संध्याकाळी सात वाजल्यानंतर या प्रवासाला आता १०-१५ नाही, तर तब्बल ४०-५० मिनीटे लागतात. हा एक दिवसाचा अनुभव नाही, तर नित्याचाच भाग झाल्याचा अनुभव या रस्त्यावरील प्रवाशांना येत आहे.
अक्षरशः मुंगीच्या पावलाने सिंहगड रस्त्यावरून वाहतूक पुढे सरकते. विठ्ठलवाडीपासून सुरू होणारी वाहतूक कोंडी धायरीपर्यंत असते. कधी उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे, कधी पाऊस पडल्यामुळे, अतिक्रमणे, बेशिस्त पार्किंग तर कधी रस्त्यातील खड्ड्यांमुळे अशा वेगवेगळ्या कारणांनी या रस्त्यावर वाहतूक कोंडी ठरलेलीच असते. सध्या सिंहगड रस्त्यावर उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू असले तरीही उपाययोजनांबाबत प्रशासकीय उदासीनता हेच प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट होत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j25052 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..