निवडणुका वेळेत घेण्याची आपची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणुका वेळेत घेण्याची आपची मागणी
निवडणुका वेळेत घेण्याची आपची मागणी

निवडणुका वेळेत घेण्याची आपची मागणी

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : महापालिका निवडणुका वेळेवर घेण्यात याव्यात, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे. ‘‘राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याच्या आणि प्रभागरचना बदलण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. या निवडणुकांमध्ये राज्य सरकार प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रभाव पाडून आपल्याला सोईस्कर अशा भूमिका घेण्याचा प्रयत्न करत असतात. नियमानुसार कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था ही ६ महिन्यांपेक्षा अधिक काळ लोकप्रतिनिधीशिवाय असायला नको. मागीलवेळी देवेंद्र फडणवीस सरकार असताना नियम बाजूला ठेवून पुण्यात भाजपच्या सोईने प्रभागरचना करण्यात आली होती. तर या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोईने करण्यात आली आहे. मतदारयादीमध्येदेखील मोठ्या प्रमाणावर अनागोंदी दिसून येते आहे. परंतु, अजून निवडणुका पुढे ढकलणे योग्य होणार नाही. ओबीसी आरक्षणासह निवडणुका व्हाव्यात,’’ असे आम आदमी पक्षाचे मत असल्याचे पक्षाचे राज्य प्रवक्ते कनिष्क जाधव यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j25081 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..