‘सीयुईटी पीजी’च्या नोंदणीसाठी मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सीयुईटी पीजी’च्या नोंदणीसाठी मुदतवाढ
‘सीयुईटी पीजी’च्या नोंदणीसाठी मुदतवाढ

‘सीयुईटी पीजी’च्या नोंदणीसाठी मुदतवाढ

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : केंद्रीय विद्यापीठे आणि अन्य विद्यापीठांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सामाईक विद्यापीठीय प्रवेश परीक्षा म्हणजेच ‘सीयूईटी पीजी’ला नोंदणी करण्यासाठी आता ११ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना या प्रवेशपरीक्षेसाठी नोंदणी करता येणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) या परीक्षेच्या नोंदणीला दिलेल्या मुदतवाढीसंदर्भात नुकतेच पत्रक प्रसिद्ध केले आहे.

देश पातळीवरील या एकाच परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना संलग्न विद्यापीठांमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी ‘सीयूईटी’ परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षा प्रक्रियेत देशातील इतर विद्यापीठेही सहभागी झाली आहेत. त्यामुळे ‘सीयूईटी’ परीक्षेला देशातील विद्यापीठांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. ‘सीयूईटी पीजी’साठी विद्यार्थ्यांना ११ जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येईल. दरम्यान, अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जातील माहितीत काही दुरुस्ती, बदल करायचा असल्यास त्यांना १२ ते १४ जुलै दरम्यान संधी दिली जाणार आहे. या बाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी ‘https://cuet.nta.nic.in/’ किंवा ‘https://nta.ac.in/’ या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन ‘एनटीए’तर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j25082 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..