आंतरमहाविद्यालयीन क्रिप्टिक क्रॉसवर्ड मोहीमेस प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंतरमहाविद्यालयीन क्रिप्टिक क्रॉसवर्ड मोहीमेस प्रतिसाद
आंतरमहाविद्यालयीन क्रिप्टिक क्रॉसवर्ड मोहीमेस प्रतिसाद

आंतरमहाविद्यालयीन क्रिप्टिक क्रॉसवर्ड मोहीमेस प्रतिसाद

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : ताथवडे येथील जेएसपीएम संचालित राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकतेच राष्ट्रीय अंतर-महाविद्यालयीन क्रिप्टिक क्रॉसवर्ड मोहिमेचे आयोजन केले. ग्लोबल इंजिनिअरिंग ॲकॅडमी संचालक डॉ. के. न. एस. आचार्य आणि एआयसीटीई पश्चिम विभागाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. अजित सिंग यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‍घाटन झाले. यावेळी जेएसपीएमचे संचालक डॉ. आर. एस. जोशी, आरएससीओईचे संचालक डॉ. आर. के. जैन उपस्थित होते. डॉ. जोशी यांनी तांत्रिक संस्थांमधील शिक्षक प्रशिक्षणाच्या महत्त्वावर भर दिला. राज्यातून ६० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला. एमसीई सोसायटी, अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी येथील आफरीन चौगले आणि मरियम मुल्ला यांनी विभागीय अंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकावला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j25200 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..