चुकवू नये असे काही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चुकवू नये असे काही
चुकवू नये असे काही

चुकवू नये असे काही

sakal_logo
By

येत्या आठवड्यात पुणेकरांनी चुकवू नयेत असे काही सांस्कृतिक कार्यक्रम ः

१) ‘अभंगरंग’ ः
बेडेकर गणपती मंदिर व संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे संत रचनांवर आधारित ‘अभंगरंग’ या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर व मंजूषा पाटील या गायन प्रस्तुती करणार आहेत.
कधी ः रविवार (ता. १०)
केव्हा ः सकाळी ९.३० वाजता
कुठे ः महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी सभागृह, मयूर कॉलनी

२) ‘ध्रुवनाद’ ः
प्रसिद्ध सारंगी वादक पं. ध्रुवज्योति घोष यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात तबला वादक पं. योगेश शम्सी यांचे एकल तबला वादन व जनाब सरबर हुसैन व अमान हुसैन यांचे युगल सारंगी वादन होणार आहे.
कधी ः शनिवार (ता. ९)
केव्हा ः बाल शिक्षण मंदिर शाळेचे एमईएस सभागृह, मयूर कॉलनी
कुठे ः सायंकाळी ५.३० वाजता

३) कॅलिग्राफी कला प्रदर्शन ः
आषाढी एकादशीनिमित्त कॅलिग्राफी कलाकार सुमीत काटकर यांच्या कॅलिग्राफी कला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. ‘अक्षरविठ्ठल’ ही या प्रदर्शनाची संकल्पना असून, यात अक्षराच्या माध्यमातून विठ्ठलाची विविध रूपे पाहायला मिळणार आहेत.
कधी ः मंगळवार (ता. ५) ते रविवार (ता. १०)
केव्हा ः सकाळी ११ ते रात्री ८.३०
कुठे ः पु. ना. गाडगीळ आर्ट गॅलरी, हॅप्पी कॉलनी

४) भजनसंध्या ः
आषाढी एकादशीनिमित्त ‘मला उमजलेली भजनसंध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी गायक अमोल निसळ हे अनुप जलोटा यांची गाजलेली भजने सादर करणार आहेत. त्यांना विशाल गंड्रतवार, रोहीत कुलकर्णी व निखिल बिडवलकर साथसंगत करणार असून, मिलिंद कुलकर्णी हे कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.
कधी ः शनिवार (ता. ९)
केव्हा ः सायंकाळी ५.३० वाजता
कुठे ः यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड

५) ‘स्वरपर्व’ ः
आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेनिमित्त तालानुभूती फाउंडेशन आणि प्राइड ग्रुप यांच्यातर्फे ‘स्वरपर्व’ या संगीत मैफिलीचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात पं. धनंजय दैठणकर यांचे शिष्य निनाद दैठणकर यांचे संतूरवादन, पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य सौरभ वर्तक यांचे बासरीवादन व पं. अजॉय चक्रबर्ती यांचे शिष्य मेहेर परळीकर यांचे गायन सादर होणार आहे.
कधी ः रविवारी (ता. १०)
केव्हा ः सायंकाळी ५ वाजता
कुठे ः बाल शिक्षण मंदिर शाळेचे एमईएस सभागृह, मयूर कॉलनी

६) ‘हिंदोळा... स्वर, शब्दांचा’
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत मृदुला मोघे प्रस्तुत ‘हिंदोळा... स्वर, शब्दांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात बंदिश, नाट्यगीते, अभंग यांचे सादरीकरण मृदुला मोघे यांच्यासह संतोष कुलकर्णी, अमित जोशी, अभिजित नांदगावकर, प्राची घोटकर आदी करणार आहेत.
कधी ः शनिवार (ता. ९)
केव्हा ः सायंकाळी ६ वाजता
कुठे ः भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j25252 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top