दागिन्यांची चोरी करणाऱ्यास बेड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दागिन्यांची चोरी करणाऱ्यास बेड्या
दागिन्यांची चोरी करणाऱ्यास बेड्या

दागिन्यांची चोरी करणाऱ्यास बेड्या

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : घर उघडे असल्याची संधी साधून रोख रकमेसह दागिन्यांची चोरी करणाऱ्या येरवडा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ९० हजारांचे दागिने जप्त केले आहेत. ही घटना १ जुलैला घडली होती. विशाल ऊर्फ जंगी सुशील गुरंग (वय ३२, रा. चांदणी चौक येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. येरवडा पोलिस आरोपींचा शोध घेत असताना पोलिस अंमलदार राहुल परदेशी यांना चोरट्याची माहिती मिळाली. आरोपी येरवडा परिसरातील महाविद्यालयाजवळ थांबल्याचे समजताच पथकाने त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मल्ल्या ऊर्फ विकास अवघडे या साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j25357 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top