पुणेकराचा माहितीपट नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणेकराचा माहितीपट नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये
पुणेकराचा माहितीपट नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये

पुणेकराचा माहितीपट नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : पुण्यातील युवा दिग्दर्शक सिध्दार्थ बाळकृष्ण दामले यांच्या ‘जिवो जिवस्य जीवनम्’ या माहितीपटाची अकराव्या इंडिया नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. हा फेस्टिव्हल भोपाळ येथे २२ ते २६ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. परसबागेतील बुलबुल पक्ष्याच्या जोडी कडून घरट्याची निर्मिती, त्यावर बहिरी ससाण्याचा हल्ला, उरलेल्या अंड्यातून होणारे प्रजनन, पुढे जाणारे जीवन आणि यातून निसर्गाचा दिला जाणारा संदेश, हा या माहितीपटाचा विषय आहे. डॉ. बाळकृष्ण दामले यांची निर्मिती असून मोहिनी दामले, मिलिंद पाटील यांनी माहितीपटासाठी संशोधन केले. राजश्री गोखले यांनी निवेदन केले असून तांत्रिक बाजू वासिम पठाण यांनी सांभाळली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j25362 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top