औंधमध्ये भरदिवसा घरफोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औंधमध्ये भरदिवसा घरफोडी
औंधमध्ये भरदिवसा घरफोडी

औंधमध्ये भरदिवसा घरफोडी

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : औंध परिसरात भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील दोन लाख ४१ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याबाबत सुनीता मोरे (वय ३७, रा. औंध) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. औंध परिसरात भैरवनाथ मंदिरासमोर असलेल्या इमारतीत मोरे यांनी सदनिका भाडेतत्वावर घेतली आहे. मोरे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास सदनिका बंद करून कामानिमित्त बाहेर पडल्या. अर्ध्या तासाने त्या घरी परतल्या. तेव्हा सदनिकेचा दरवाजा उचकटल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी कपाट उचकटून सोन्याचे दागिने लांबविल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j25366 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top