तरुणींशी मैत्रीच्या आमिषाने १८ लाखांचा गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणींशी मैत्रीच्या आमिषाने १८ लाखांचा गंडा
तरुणींशी मैत्रीच्या आमिषाने १८ लाखांचा गंडा

तरुणींशी मैत्रीच्या आमिषाने १८ लाखांचा गंडा

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : तरुणींशी मैत्री करण्याचे आमिष दाखवून एकाला चोरट्यांनी १८ लाख ३७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एकाने सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तक्रारदार एका खासगी कंपनीत अधिकारी आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर रीना नावाच्या एका महिलेने संपर्क साधला. एका संकेतस्थळाच्या माध्यमातून उच्चभ्रू तरुणींशी मैत्री करून दिली जाते. त्यासाठी नावनोंदणी करावी लागेल, अशी बतावणी या महिलेने केली. रिनाने त्यांच्या मोबाईल क्रमांकावर काही तरुणींची छायाचित्रे पाठविली. त्या आमिषाला तक्रारदार बळी पडले.
तक्रारदाराकडे वेळोवेळी बतावणी करून त्यांच्याकडून १८ लाख ३७ हजार ६०० रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे फिर्याद दिली. वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून तक्रारदाराशी संपर्क साधून आमिष दाखविल्याचे उघडकीस आले. गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे तपास करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j25373 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..