चोरीप्रकरणी एकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोरीप्रकरणी एकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला
चोरीप्रकरणी एकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

चोरीप्रकरणी एकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : ज्ञानेश्‍वर पादुका चौकातील एका दुकानातून फ्रिज आणि कुलरसह इतर वस्तूंची चोरी केल्याप्रकरणी एकाचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश एस. जी. वेदपाठक यांनी हा आदेश दिला. सलमान उस्मान शेख (रा. वानवडी बझार) असे जामीन फेटाळण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत रिझवान रियाज शेख (रा. जनवाडी) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सलमान शेख याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ज्ञानेश्‍वर पादुका चौकात असलेल्या श्रीनाथ प्लाझामधील दुकानातून आठ फेब्रुवारी रोजी फ्रिज, सोफा असे एकूण दोन लाख रुपये किमतीचे साहित्य चोरीला गेले होते. या गुन्ह्यात सलमान शेख यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j25393 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..