
विमान वाहतूक उद्योगातील करिअर संधींविषयी वेबिनार
पुणे, ता. ८ : भारतात विमान वाहतूक उद्योगाची जोरदार भरभराट होत आहे. मात्र त्यात फ्लाइट केबिन क्रू, एअरलाइन तिकीट व्यवस्था, ग्राउंड स्टाफ यातील तज्ज्ञ मनुष्यबळाची नेहमी कमतरता भासते. ही उणीव भरून काढण्यासाठी व या उद्योगाची गरज ओळखून तयार करण्यात आलेला खास अभ्यासक्रम लवकरच सुरू होत आहे. जगभर फिरण्याची संधी देणारे हे आव्हानात्मक करिअर आहे.
एक वर्षाच्या या कोर्समध्ये सुरुवातीला विशेष प्रात्यक्षिकांसह सहा महिन्यांचे व्यावहारिक प्रशिक्षण दिले जाईल आणि नंतरच्या सहा महिन्यांत सशुल्क इंटर्नशिप दिली जाईल. कोर्स पूर्ण झाल्यानंतर प्लेसमेंट साह्य पुरवले जाणार आहे. बारावी उत्तीर्ण झालेले १७ ते २५ या वयोगटातील उमेदवार यासाठी पात्र असतील.
यासंदर्भात अधिक माहिती देणारा विनामूल्य वेबिनार १७ जुलैला होणार आहे. यात सहभागी होऊन नोकरीची संधी उपलब्ध असणाऱ्या व विमान उद्योग क्षेत्रातील करिअर संधींविषयी जाणून घेता येईल व स्वतःच्या करिअरची यशस्वी सुरुवात करता येईल.
नावनोंदणीसाठी क्यूआर कोड : PNE22S76454
अधिक माहितीसाठी संपर्क : ८६६९६८९०१५.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j25974 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..