
येरवडा कारागृहात कैद्याची आत्महत्या
पुणे, ता. ८ : येरवडा मध्यमवर्ती कारागृहातील झाडाला गळफास घेऊन एका कैद्याने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता.७) दुपारी तीन वाजता घडली. पत्नीचा खून केल्याने त्यास न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली होती. सचिन मधुकर नरवाडे (वय ३१ , रा. शिक्रापूर, मूळ रा. सावंगी, भोकरदन,जालना) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे.
सचिन हा त्याची पत्नी कांचन हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी सातत्याने भांडत असे. दोन जून २०२२ या दिवशी शिक्रापूर परिसरातील बजरंगवाडी येथे त्याने पत्नीचा गळा दाबून खून केला होता. या प्रकरणात शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सचिनला अटक केली होती. त्यानंतर न्यायालायाच्या आदेशाने सचिनला कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवले होते. दरम्यान, कारागृहातील रुग्णालय विभागाच्या जवळील बराक क्रमांक दोनजवळच्या वडाच्या झाडाला सचिनने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26058 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..