डॉ. मधुसूदन घाणेकर यांच्या एकपात्री कार्यक्रमाची ६० वर्षे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. मधुसूदन घाणेकर यांच्या
एकपात्री कार्यक्रमाची ६० वर्षे
डॉ. मधुसूदन घाणेकर यांच्या एकपात्री कार्यक्रमाची ६० वर्षे

डॉ. मधुसूदन घाणेकर यांच्या एकपात्री कार्यक्रमाची ६० वर्षे

sakal_logo
By

पुणे, ता. ८ ः डॉ. मधुसूदन घाणेकर यांच्या ‘बे दुणे चकली’ या एकपात्री कार्यक्रमाला नुकतीच ६० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलेल्या ताथवडे गावातील त्यांच्या शाळेत या एकपात्री कार्यक्रमाचा प्रयोग डॉ. घाणेकर यांनी सादर केला. प्राण्यापक्ष्यांच्या आवाजाची नक्कल, शिट्टीवर वाजवणारी गाणी, विनोदी पाढे, बोलकी बाहुली, हसण्याचे व रडण्याचे गंमतीदार प्रकार अशा अनेक गंमतीदमती सादर केल्या. या कार्यक्रमात मुले दंगून गेली होती. या कार्यक्रमाचे संयोजन ज्येष्ठ शिक्षक बाळकृष्ण बेल्हेकर यांनी केले होते. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षिका ललिता वाघमारे उपस्थित होत्या. डॉ. घाणेकर यांनी या कार्यक्रमाचे आजवर देशविदेशांत हजारो प्रयोग केले असून यासाठी त्यांना चार्ली चॅप्लिन आंतरराष्ट्रीय पुरस्कारासह विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26081 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top