स्वारगेट बस स्थानक समस्यांचे ''आगार'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वारगेट बस स्थानक समस्यांचे ''आगार''
स्वारगेट बस स्थानक समस्यांचे ''आगार''

स्वारगेट बस स्थानक समस्यांचे ''आगार''

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : स्वारगेट बस स्थानकामध्ये पिण्याचे पाणी तसेच आवश्यक सुविधा नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. बस स्थानकाच्या प्रवेशव्दाराजवळ मोठे खड्डे पडलेले आहेत. सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे त्यात पाणी साचत असल्याने त्यातूनच वाट काढताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

फलाटावर सर्वत्र अस्वछता, स्वछतागृहातील पाण्याची व्यवस्था नाही. काही नळांच्या तोट्या तुटलेल्या आहेत. परिसरात घाणीमुळे मोठी दुर्गंधी पसरलेली आहे. यातून प्रवाशांना ये-जा करावी लागत आहे. स्वच्छतागृहात प्रशासनाकडून स्वच्छतेची योग्य खबरदारी न घेतल्याने बाहेर गावाहून आलेल्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

एसटी प्रवाशांना केवळ बस स्थानकातल्याच समस्यांशीच नाही तर परिसरात निर्माण होणाऱ्या वाहतुकीचा कोंडीला देखील सामोरे जावे लागते आहे.जेधे चौकात वाहतूक कोंडी नेहमीची झालेली. बस स्थानकांवर येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांना या कोंडीचा फटका बसतो. कोंडीत अडकल्याने अनेक प्रवाशांची एसटी निघून जाते. त्यामुळे त्यांना फलाटावर दुसऱ्या गाडीची वाट पाहत बसावे लागते. चौकात वाहतूक नियमनाचे प्रयत्न वाहतूक पोलिस करतात. मात्र त्याचा ही फारसा परिणाम होताना दिसून येत नाही.
------------------
स्वारगेट बस स्थानकात अपुऱ्या सुविधा आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. फलाटावर देखील अस्वच्छता असते. एसटी प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- राजेश महामुनी, प्रवासी.

मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे रिक्षास्टँडची जागा अपुरी पडते. त्यामुळे जिथे मोकळी जागा असेल तिथे आम्ही रिक्षा उभ्या केल्या जातात. रिक्षा स्टॅन्डसाठी स्वतंत्र जागा मिळाल्यास आम्ही इतरत्र रिक्षा न लावता स्टँडवरच रिक्षा लावू. यामुळे वाहतूक कोंडी टळेल.
- निखिल लोखंडे, रिक्षाचालक, स्वारगेट

एस.टी.ची वाहतूक सेवा सुरू असून, पार्सल सेवा बंद असल्यामुळे आम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पार्सल सेवा सुरु होणे गरजेचे आहे.
- मारुती शिंदे, खासगी कर्मचारी पार्सल सेवा

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26093 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top