
वारकऱ्यांच्या वाहनांसाठी आजपासून स्टिकर्सचे वितरण टोल माफीसाठी ‘आरटीओ’कडून एक खिडकी योजना
पुणे, ता. ८ : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी,भाविकांच्या वाहनांसाठी राज्य सरकारने टोल माफ केला आहे. स्टिकर्स असलेल्या वाहनांना टोलमधून वगळण्यात आले आहे. पुणे आरटीओ कार्यालयात शनिवारी (ता. ९) व रविवारी (ता. १०) या स्टिकर्सचे वितरण केले जाणार आहे.
पोलिसांना देखील स्टिकर्स वितरण्याचे अधिकार देण्यात आले आहे. आरटीओ कार्यालयाने याची तयारी पूर्ण केली असून शनिवारपासून यासाठी एक खिडकी राखीव करण्यात येणार आहे. आवश्यक ते कागदपत्रे दिल्यानंतर तत्काळ भाविकांना स्टिकर्स दिले जाणार आहे. पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या वारकरी व भाविकांच्या हलक्या व जड वाहनांसाठी स्टिकर्स देण्याचे आदेश परिवहन विभागाने दिले. या सवलतीसाठी वाहनचालकांनी योग्य ते कागदपत्रे घेऊन आरटीओ कार्यालयात कार्यालयीन वेळेत यावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26112 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..