पुणे-भगत की कोठी विशेष रेल्वे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे-भगत की कोठी विशेष रेल्वे
पुणे-भगत की कोठी विशेष रेल्वे

पुणे-भगत की कोठी विशेष रेल्वे

sakal_logo
By

पुणे, ता. ८ : दिवाळी व छटपूजेसाठी प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त गाड्या चालविण्याचे नियोजन केले आहे. यात पुणे-भगत की कोठी ही साप्ताहिक विशेष धावणार आहे. गाडी क्रमांक (०१२४९) २२ ऑक्टोबर २०२२ ते १९ नोव्हेंबर २०२२ दरम्यान दर शुक्रवारी पुणे येथून रात्री ८ वाजून १० मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी ती भगत की कोठी येथे पोचेल.

गाडी क्रमांक (०१२५०) २३ ऑक्टोबर २०२२ ते २० नोव्हेंबर २०२२ दरम्यान भगत की कोठी येथून रात्री १० वाजून २० मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी पुण्याला पोचेल. गाडीला लोणावळा, कल्याण, वसई रोड, सूरत, वडोदरा, अहमदाबाद, मेहसाणा, पालनपूर, भिल्डी, धानेरा, राणीवाडा, मारवाड भीनमल, मोडरान, जालोर, मोकलसर, समाधारी आणि लुनी या स्थानकांवर थांबा देण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26123 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..