एकतर्फी प्रेमातून अपहरण करणाऱ्यास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकतर्फी प्रेमातून अपहरण करणाऱ्यास अटक
एकतर्फी प्रेमातून अपहरण करणाऱ्यास अटक

एकतर्फी प्रेमातून अपहरण करणाऱ्यास अटक

sakal_logo
By

पुणे, ता. ८ : एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यासमवेत लग्न करण्यासाठी तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास वानवडी पोलिसांनी अटक केली. मुलीची सुटका करून कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. ही घटना हडपसर परिसरात घडली.

कृष्णा राजू देवकुळे (वय १८, रा. अंधशाळेसमोर, रामटेकडी, हडपसर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. देवकुळे याचे अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम आहे. मागील काही दिवसांपासून तो मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. मागील महिन्यात त्याने मुलीला शाळेच्या परिसरात अडवून माझ्याशी लग्न केले नाही तर आई-वडिलांना जीवे मारेल, माझे मित्र गुंड आहेत, अशी धमकी दिली होती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी तो मुलीच्या घरात शिरला, मुलीला धमकावून घरातून बाहेर नेले. त्यानंतर मुलीला त्याच्या घरात डांबून ठेवले. त्याने पुन्हा मुलीला लग्न कर, अन्यथा आई-वडिलांना मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने तिच्या आईला याबाबत माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या आईने वानवडी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मुलीची सुटका करून तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. तसेच देवकुळे याला अटक केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26131 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..