अकरावी ऑनलाइन प्रवेश : चार लाख ३० हजार विद्यार्थ्यांची नोंदणी ाराज्यात पावणे चार लाख जागा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकरावी ऑनलाइन प्रवेश : चार लाख ३० हजार विद्यार्थ्यांची नोंदणी
ाराज्यात पावणे चार लाख जागा
अकरावी ऑनलाइन प्रवेश : चार लाख ३० हजार विद्यार्थ्यांची नोंदणी ाराज्यात पावणे चार लाख जागा

अकरावी ऑनलाइन प्रवेश : चार लाख ३० हजार विद्यार्थ्यांची नोंदणी ाराज्यात पावणे चार लाख जागा

sakal_logo
By

पुणे, ता. ८ : राज्यात इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जवळपास एक हजार ६४२ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तीन लाख ८२ हजार ७०१ जागा उपलब्ध झाल्या आहेत. या प्रवेशासाठी आतापर्यंत चार लाख ३० हजार ५४४ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नागपूर, नाशिक आणि अमरावती महापालिका क्षेत्रात केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेतंर्गत एकूण प्रवेशासाठी उपलब्ध जागा, कॅप फेरीअंतर्गत प्रवेशाच्या जागा, रिक्त जागा, कोट्यांतर्गत प्रवेशाच्या जागा याबाबत तपशील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. त्यानुसार पुण्यात ३०९ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. त्याद्वारे एकूण एक लाख सहा हजार १४० जागा उपलब्ध झाल्या असून त्यातील ८१ हजार ६९९ जागा या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत उपलब्ध आहेत.

*उपलब्ध जागांचा तपशील :*
महापालिका क्षेत्र : महाविद्यालये : प्रवेश क्षमता : ‘कॅप’अंतर्गत प्रवेश क्षमता
मुंबई : १,०११ : ३,७०,४७५ : २,३०,००२
पुणे : ३०९ : १,०६,१४० : ८१,६९९
नागपूर : १९४ : ५२,०६० : ३७,१८४
नाशिक : ६३ : २६,४८० : २२,०७६
अमरावती : ६५ : १६,१९० : ११,७४०
........
महापालिका क्षेत्र : ऑनलाइन नोंदणी केलेले विद्यार्थी
मुंबई : २,७४,६२७
पुणे : ८९,८६०
नागपूर : ३०,८९५
नाशिक : २४,८३०
अमरावती : १०,३३२

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26138 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..