रेनकोट खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेनकोट खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी
रेनकोट खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी

रेनकोट खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : शहरात सध्या पावसाचा जोर वाढत आहे. यामुळे नागरिकांची रेनकोट, छत्री यासह पावसाळी साहित्यांची खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी वाढली आहे. यंदा रेनकोट आणि छत्रीचे भाव वाढले आहेत. रेनकोटचे भाव ५०० रुपयांपासून दीड हजार रुपयांपर्यंत आहेत.
शहर परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे बाजारात आता नागरिक पावसाळी साहित्य खरेदीसाठी गर्दी करत आहेत. यावर्षी पीव्हीसी, प्लास्टिक, पॅराशूट, पीयू, पोंचो या प्रकारचे रेनकोट विक्रीसाठी आलेले आहेत. लहान मुलांसाठी पँट शर्ट सूट असून त्याचा भाव २०० ते ७०० रुपये आहे. महिलांसाठी वनपिस मटेरिअल असून, त्याचा भाव ५०० ते १५०० रुपये आहे. पुरुषांसाठी पँट शर्ट सूट असून, ते भाव ५०० ते १५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. सध्या पोंचो मटेरिअल या रेनकोटचा ट्रेंड सुरू आहे. दरम्यान, कोरोनामुळे व्यवसायात फटका बसल्यामुळे व्यापाऱ्यांनी पावसाळी साहित्याच्या भावात वाढ केली आहे.

रेनकोटच्या भावात २० ते ३० टक्के वाढ झाली आहे. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे व्यापारात फटका बसला. परंतु, यावेळेस ग्राहकांची पावसाळी साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी वाढत आहे. ग्राहक पॅराशूट आणि पोंचो मटेरिअल या प्रकारच्या रेनकोटला पसंती देत आहेत.
- भाविक शहा, रेनकोट आणि छत्री विक्रेता
--------
फोटो क्रमांक- ७६४५६
----

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26287 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top