उपनगरांत अग्निशामक केंद्रासाठी कसरतच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपनगरांत अग्निशामक केंद्रासाठी कसरतच
उपनगरांत अग्निशामक केंद्रासाठी कसरतच

उपनगरांत अग्निशामक केंद्रासाठी कसरतच

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : शहराचा विस्तार होत असताना अग्निशामक दलात मनुष्यबळ कमी पडत आहे. या विभागात कायमस्वरूपाची भरती करण्यासाठी नियमावलीला मंजुरी मिळाली असली तरी इतक्यात भरती होणार नाही. त्यामुळे हा विभाग चालविण्यासाठी ५ कोटी ३८ लाख रुपये खर्च करून २०० कंत्राटी फायरमन घेतले जाणार आहेत. पण जुन्या अग्निशामक केंद्रात अपुरे मनुष्यबळ असल्याने तेथे त्यांचा वापर होणार आहे. शिवाय निवडणुकीच्या तोंडावर माननीयांनी दबाव टाकून उद्‍घाटन करून बंद केलेली अग्निशामक केंद्र सुरू करताना प्रशासनाची तारेवरची कसरत होणार आहे.

पुणे शहराची हद्द वाढल्याने उपनगरांमध्ये अग्निशामक बंब पोचण्यास वेळ लागतो आहे. त्यामुळे आग विझविण्यास उशीर लागतो. त्यामुळे वित्तहानी होतेच पण अनेकांचा जीव धोक्यात जात आहे. २०१७ मध्ये अकरा गावे समाविष्ट केल्याने महापालिकेची हद्द ३२१ चौरस किलोमीटर झाली होती. २०२१ मध्ये २३ गावे समाविष्ट केल्यानंतर ही हद्द ५२५ चौरस किलोमीटर इतकी झाली आहे. त्यामुळे क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठी महापालिका अशी बिरुदावली लावली जात असली तरी अपुऱ्या सुविधेमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत.

पुणे शहरात सध्या १४ अग्निशामक केंद्र सुरू आहेत, ३४ समाविष्ट गावांमध्ये एक देखील अग्निशामक केंद्र नाही. त्यातच गेल्या दहा वर्षापासून अग्निशामक केंद्रात भरती न झाल्याने जवळपास ६०० पदे रिक्त आहेत. गेल्याच महिन्यात अग्निशामक दलाच्या सेवा प्रवेश नियमावलीस मान्यता मिळाली पण त्याचे रोस्टरचे काम पूर्ण करण्यास किमान एका वर्षाचा कालावधी लागणार आहे.
पुणे महापालिकेची मुदत १४ मार्च रोजी संपणार असल्याने त्यापूर्वी नगरसेवकांनी गडबडीत अग्निशामक केंद्राच्या कोनशिलेवर स्वतःचे नाव येण्यासाठी उद्‍घाटनाचे कार्यक्रम पार पाडले, पण त्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच धायरी, धानोरी, वारजे, गंगाधाम आणि घोरपडी ही पाच केंद्र बंदच आहेत.

एका पाळीला लागतात दहा कर्मचारी
अग्निशामक केंद्र सुरू करताना एका पाळीला किमान दहा कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते उपनगरांमधील केंद्र सुरू करण्यासाठी एका पाळीला १० म्हणजे २४ तासासाठी ३० कर्मचारी आवश्यक असतात. म्हणजे ५ केंद्र सुरू करण्यासाठी २०० पैकी १८० कर्मचारी याच ठिकाणी वापरले जाणार आहेत. पण शहरातील १४ केंद्रावर एका पाळीत ४-५ कर्मचारी असतात, तेथेही पुरेसे मनुष्यबळ आवश्यक असल्याने या २०० पैकी काही जणांना याठिकाणी नियुक्त केले जाईल. त्यामुळे २०० जणांचे वाटप करताना प्रशासनाची तारांबळ उडणार आहे.


अग्निशामक दलाच्या सेवा प्रवेश नियमावलीस मान्यता मिळाल्याचे तरी अद्याप रोस्टरचे काम शिल्लक आहे त्यामुळे एका वर्षासाठी दोनशे कंत्राटी कामगार घेण्याचा निर्णय नुकत्याच स्थायी समितीमध्ये झाला या कर्मचाऱ्यांद्वारे उपनगरातील पाच केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न आहे. तसेच जुन्या केंद्रांवरही अपरिमेय शिवाय असल्याने त्याचेही या मनुष्यबळाचे वाटप केले जाईल.
- सुनील गिलबिले, प्रमुख, अग्निशामक दल

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26294 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..