विद्येच्या प्रांगणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्येच्या प्रांगणात
विद्येच्या प्रांगणात

विद्येच्या प्रांगणात

sakal_logo
By

विद्येच्या प्रांगणात

विश्‍वकर्मा विद्यालयात पालखी सोहळा
पुणे, ता. ९ : बन्सीलाल रामनाथ अगरवाल चॅरिटेबल ट्रस्ट संचालित विश्वकर्मा विद्यालयात (मराठी माध्यम) पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध संतांच्या वेषभूषा करून विद्यार्थी सहभागी झाले होते. मुख्याध्यापक राजेंद्र जाधव आणि सुनंदा सरडे यांनी यांनी पालखी पूजन केले. यानिमित्त परिसरात आरोग्य दिंडी काढण्यात आली. ‘स्वच्छता दूत म्हणून संपूर्ण वर्षभर कार्य करू, शाळा स्वच्छ नि सुंदर ठेऊ’ अशी शपथ विद्यार्थ्यांनी यावेळी घेतली. शाळा संस्थापिका तृप्ती अग्रवाल, सचिव आर. सी. बेटावदकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

माऊलींच्या जयघोषात ग्रंथदिंडी
पुणे, ता. ९ : हुजूरपागा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल प्री प्रायमरीमध्ये कात्रज विभागामध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधून ग्रंथदिंडी सोहळा आयोजित केला होता. शाळेतील विद्यार्थिनी या ग्रंथ दिंडीत वारकरी म्हणून सहभागी झाल्या होत्या. पूर्व प्राथमिक शाळेच्या समन्वयक अर्पिता कुलकर्णी यांनी बालकथांच्या पुस्तकाची पूजा करून पुस्तकांचे महत्त्व मुलींना समजावून सांगितले. शाळेतील सहशिक्षिका दीप्ती कुलकर्णी यांनी पालखी विषयी माहिती सांगितली.

विद्यार्थ्यांनी अनुभवले पारंपरिक खेळ
पुणे, ता. ९ : सेवासदन दिलासा केंद्र येथे पालखी सोहळा झाला. या सोहळ्यात विठ्ठल, रूक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत निवृत्ती महाराज, अशा विविध संतांशी वेशभूषेसह विद्यार्थी वारकरी झाले होते. फुगड्या, रिंगण असे पारंपारिक खेळही विद्यार्थ्यांनी अनुभवले. मुख्याध्यापक संगीता नागपूरकर व सर्व कर्मचारी वर्ग यात उत्साहात सहभागी झाले होते.

गिरमे विद्यालयात पालखी सोहळा
पुणे, ता. ९ : श्री. ह. ब. गिरमे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. इयत्ता पाचवीचे विद्यार्थी विठ्ठल-रुक्मिणी व संतांच्या वेशभूषेत डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाले. शाळेत विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी फुगड्या घातल्या, यात शाळेतील शिक्षकही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

विद्यार्थ्यांनी घेतला आनंद वारीचा अनुभव
पुणे, ता. ९ : मुखी विठुनामाचा गजर, हातात वैष्णवांचा पताका आणि पालखीमध्ये श्री ज्ञानेश्वरी घेऊन विद्यालयात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा वेष करून तसेच विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळस आणि विठ्ठल रखुमाईची मूर्ती घेऊन आनंदाने वारीचा अनुभव घेतला. योगेश ससाणे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी बाळासाहेब न्हावले, मुख्याध्यापिका शशिकला कुंभार, पर्यवेक्षिका मीनाक्षी लंगोटे आदी उपस्थित होते.

वाघोलीमध्ये अवतरली पंढरी
पुणे, ता. ९ : वाघोली येथील पीडीईए विठ्ठलराव सातव इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये नर्सरी ते इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. टाळ, मृदंगाचा ठेका धरत फुगडीचे वेगवेगळे प्रकार व नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यालयातील विद्यार्थी स्वरूप पाचर्णे याने ‘विठोबा’, तर वेदिका धायरकर हिने ‘रुक्मिणी’ची वेशभूषा केली होती.

सरहद पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी सोहळा
पुणे, ता. ९ : सरहद पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी सोहळा उत्साहात साजरा केला. यावेळी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा नहार विश्वस्त शैलेश वाडेकर, पर्यवेक्षिका मनीषा वाडेकर, सरहद प्री-प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका पल्लवी पासलकर, सरहद पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका सुजाता गोळे आदी मान्यवर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी ढोरे यांनी केले.


विजय वल्लभ शाळेची १०० टक्के निकाल
पुणे, ता. ९ : रास्ता पेठेतील आचार्य श्री विजय वल्लभ शाळेतील
इयत्ता दहावीचे १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रणव ओसवाल, ओम बिंगी, तन्वी पुनमिया, सिद्धेश वाणी, सार्थक वाघमारे यांनी घवघवीत यश मिळविले. यावर्षी शाळेतील ११५ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यातील १४ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त, तर ४२ विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांपेक्षा गुण मिळाले आहेत. शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ ए. के. पानसरे, संस्थेचे अध्यक्ष सुभाष परमार, शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी मारुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26298 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..