सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा रुचिता जाधवला अवॉर्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा रुचिता जाधवला अवॉर्ड
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा रुचिता जाधवला अवॉर्ड

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा रुचिता जाधवला अवॉर्ड

sakal_logo
By

‘एनिग्मा-द फॉलेन एंजल’ हा एक इंग्रजी चित्रपट असून यातील मुख्य अभिनेत्री रुचिता जाधव यांनी जागतिक पातळीवर नामांकित अशा ‘पॅरिस फिल्म अवॉर्ड’ येथील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असा अवॉर्ड जिंकत एक नवीन उच्चांक स्थापित केला आहे. यापूर्वी रुचिता जाधव यांनी ‘ईस्टर्न युरोपियन फिल्म फेस्टीवल’मध्येसुद्धा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असा अवॉर्ड जिंकला आहे.

एनिग्मा-द फॉलेन एंजल या चित्रपटाने जगभरात दीडशेहून अधिक अवॉर्ड जिंकले आहेत, तरी पॅरिस फिल्म अवॉर्डमध्ये या एका चित्रपटाने ‘बेस्ट थ्रिलर’, ‘बेस्ट शॉर्ट फिल्म’, ‘बेस्ट डायरेक्टर’, ‘बेस्ट प्रोड्यूसर’, ‘बेस्ट ॲक्ट्रेस’, ‘बेस्ट स्क्रीनप्ले’, ‘बेस्ट साउंड डिझाईन’, ‘बेस्ट एडिटिंग’ असे आठ विविध अवॉर्ड जिंकले आहेत.

एनिग्मा- द फॉलेन एंजल ही अभय ठाकूर दिग्दर्शित असून, यतीन कारेकर आणि रुचिता जाधव यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांनी मुख्य भूमिका साकार केल्या आहेत. या चित्रपटाची शूटिंग पुण्यात झाली असून, अतिशय कष्टाने अभय ठाकूर यांनी हा चित्रपट तयार केला आहे; तरी आता जागतिक पातळीवर ते नावलौकिक कमवीत आहेत.
PNE20Q59219

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26366 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top