कोटी रुपयांसाठी ‘आरटीओ’ला धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोटी रुपयांसाठी ‘आरटीओ’ला धमकी
कोटी रुपयांसाठी ‘आरटीओ’ला धमकी

कोटी रुपयांसाठी ‘आरटीओ’ला धमकी

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः परस्पर वाहन विक्रीप्रकरणी दाखल गुन्ह्यातील पिंपरी-चिंचवड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्धच्या तक्रारी बंद करण्यासाठी आणि त्यांच्याकडून एक कोटी रुपये गोळा करून देण्याची थेट प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडे (आरटीओ) मागणी करून, त्यांना धमक्‍या दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दाम्पत्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, एकास अटक झाली आहे.

सचिन काशिनाथ गव्हाणे (रा. राजगुरुनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सचिन याच्या मालकीचा टाटा कंपनीचा ट्रक होता. त्याचा भाऊ समीर याने सचिनच्या परस्पर संबंधित ट्रकच्या कागदपत्रांवर सचिन याची स्वाक्षरी करून त्याची विक्री केली होती. याप्रकरणी सचिन याने त्याच्या भावासह पिंपरी-चिंचवड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, भोसरी पोलिसांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यास परवानगी मिळण्याबाबतचा प्रस्ताव मुंबई येथील परिवहन आयुक्‍तांकडे केला होता. याप्रकरणी सध्या विभागीय चौकशी सुरू आहे. दरम्यान, सचिन याने विविध कार्यालयामध्ये परिवहन अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध ईमेल व तक्रार अर्ज केले आहेत. याप्रकरणी शासनाने फिर्यादींना पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, गव्हाणे, त्याची पत्नी यांनी आपापसांत संगनमत करून फिर्यादींच्या कार्यालयात जाऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्धच्या तक्रारी बंद करण्यासाठी त्यांच्याकडून एक कोटी रुपये घेऊन देण्याची मागणी फिर्यादीकडे केली होती. त्यानंतर त्यांनी स्वतःच एकतर्फी ८५ लाख रुपये रक्कम निश्‍चित करून, ही रक्कम फिर्यादी यांनी गोळा करून द्यावी, अशी फिर्यादीकडे वारंवार मागणी करीत होते. या सगळ्या प्रकाराला फिर्यादीने नकार दिला, त्यानंतर त्यांनी फिर्यादी शिंदे यांना धमक्‍या देण्यास सुरुवात केली. तसेच राज्यघटनेबाबत अवमानकारक ईमेल फिर्यादी यांचे तसेच अन्य कार्यालयांना पाठविले. तसेच फिर्यादी शिंदे यांच्याविषयी बदनामीकारक व अश्लील मजकूर लिहून त्यांची बदनामी केली.

‘‘भोसरी पोलिस ठाण्यात वाहन विक्रीप्रकरणी एका व्यक्तीसह पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. हे प्रकरण आयुक्त कार्यालयाकडे प्रलंबित आहे. त्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न सचिन गव्हाणे व त्याची पत्नी करीत होते. ते पैसे मी गोळा करून द्यावेत, यासाठी माझ्याकडे मागणी करून मला धमकी देत होते. कार्यालय प्रमुख म्हणून या प्रकराची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.’’
- अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26381 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..