शिक्षकभरतीसाठी नव्याने स्व प्रमाणपत्र पूर्तता गरजेची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकभरतीसाठी नव्याने स्व प्रमाणपत्र पूर्तता गरजेची
शिक्षकभरतीसाठी नव्याने स्व प्रमाणपत्र पूर्तता गरजेची

शिक्षकभरतीसाठी नव्याने स्व प्रमाणपत्र पूर्तता गरजेची

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि २०१७ मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेल्या, तसेच पोर्टलवर नोंद केलेल्या सर्वच उमेदवारांना नव्याने स्व प्रमाणपत्र पूर्ण करणे, बदल करणे याची सुविधा शालेय शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नव्याने स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी १७ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांनी ‘https://mahateacherrecruitment.org.in’ या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाने शिक्षक भरतीच्या संकेतस्थळावर केले आहे.
मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या ५६१ व्यवस्थापनाच्या दोन हजार ६२ रिक्त पदांसाठी पोर्टलमार्फत २ सप्टेंबर २०२१ रोजी पात्र उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस केली आहे. व्यवस्थापनाच्या जाहिरातीमध्ये एसईबीसी प्रवर्गासाठी जागा होत्या, तथापि खुल्या प्रवर्गासाठी जागा नाहीत, अशा १९६ व्यवस्थापनासाठी नव्याने प्राधान्यक्रम घेऊन पदभरतीची कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने १९६ व्यवस्थापनातील पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना स्व प्रमाणपत्र पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे.
काही उमेदवारांकडून गैरसमजुतीने वा चुकीने पोर्टलवर स्व प्रमाणपत्रात चुकीची, अपूर्ण माहिती भरलेली असल्यामुळे या माहितीमध्ये बदल करण्याची उमेदवारांकडून दोन वर्षापासून सातत्याने होत असलेली विनंती लक्षात घेता अशा उमेदवारांना स्व प्रमाणपत्रात योग्य तो बदल करण्याची सुविधा २४ सप्टेंबर २०२१पासून दिली होती. परंतु, उमेदवारांचे स्व प्रमाणपत्र अपडेट झालेले नाहीत. ते आता नव्याने उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
१९६ व्यवस्थापनातील पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना स्व प्रमाणपत्र नव्याने पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा उमेदवारांचा पदभरतीसाठी विचार केला जाणार नाही, याची नोंद घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
स्व प्रमाणपत्रातील नोंद करण्याचा कालावधी संपल्यानंतर उमेदवारांकडून रिक्त पदांसाठी प्राधान्यक्रम घेण्यात येतील. उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन मुलाखतीसाठी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस करण्यात येईल. याबाबत सूचना पोर्टलवर स्वतंत्रपणे देण्यात येतील, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.


अनेक दिवसांपासून तांत्रिक अडचणीवरच प्रशासनाचे काम सुरू आहे. प्रत्यक्ष भरती प्रक्रिया कधी होणार, याची प्रतीक्षा अभियोग्यता धारकांना आहे. शिक्षक पदभरतीबाबत सध्याच्या शिक्षण विभागाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते.
- संतोष मगर, अध्यक्ष, डीटीएड बीएड स्टुडंट असोसिएशन

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26416 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top