पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्क माफीची सवलत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना 
मिळणार शुल्क माफीची सवलत
पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्क माफीची सवलत

पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्क माफीची सवलत

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः कोरोनामुळे पालक गमाविलेल्या विद्यार्थ्यांना खरंच शैक्षणिक शुल्कात सवलत मिळाली की नाही, हे तपासण्यात येणार असून या विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी याबाबतचे परिपत्रकही जारी केले आहे.

‘स्टुडंट हेल्पींग हॅंड्स’च्यावतीने यासाठी पाठपुरावा करत ७०५ हून अधिक पालक गमाविलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाकडे सुपूर्त केली होती. त्याआधारे विद्यापीठाने हे परिपत्रक काढल्याचे संघटनेचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी सांगितले. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये प्रवेश घेतलेल्या आणि कोरानामुळे पालक गमाविलेल्या विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत देण्यात आली आहे. मात्र, काही महाविद्यालयांनी शुल्कात सवलत दिली नसल्याच्या तक्रारी विविध विद्यार्थी संघटनांकडून येत आहे. या पार्श्वभूमीवर ३१ जुलैपर्यंत याबाबतचा अहवाल विद्यापीठाकडे पाठविण्यात यावा. कोरोनामूळे पालक गमावलेल्या विद्यार्थांना शैक्षणीक शुल्क माफ करण्यासह त्याचे पालकत्व समाजातील दानशूर संस्था, व्यक्तीनी स्वीकारावे, असे या परिपत्रकात नमूद केले असल्याचे आंबेकर यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26424 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top