
पुस्तकाबाहेरील ज्ञानही आत्मसात करावे : पाटील
पुणे, ता. ९ : ''''नव्याने आर्किटेक्ट म्हणून करिअर करणाऱ्या तरुणांनी आनंदासाठीच काम करावे. मात्र, ते करताना समाजाचे, पर्यावरण, निसर्ग साखळी या सारख्या विषयांचेही भान ठेवून त्यात सार्वजनिक हितासाठी सहभाग घ्यावा. पुस्तकातील ज्ञान म्हणजेच पूर्ण ज्ञान नव्हे. तर त्या पलिकडेही बरेच लपलेले ज्ञान असून, ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा,'''' असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी केले.
दरम्यान, तरुण आर्किटेक्टसना पिंपरी चिंचवड या नव्याने विकसित होत असलेल्या शहरात कामाची चांगली संधी उपलब्ध असून त्याचा फायदा घेण्यासाठी या नव्या शहरात या असे आवाहनही त्यांनी केले.
विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पीव्हीपी कॉलेज ऑफ आर्किटेक्टच्या वतीने ‘दी एक्झिट एक्झिबिशन २०२२’ हे प्रदर्शन भरविण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक रंगमंदिराच्या कलादालनात महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन भरविले. हे प्रदर्शन रविवारी (ता.१०) बघण्यासाठी खुले राहणार आहे.
प्रदर्शनातील प्रकल्पांची माहिती देणाऱ्या ‘दी एक्झिट’ या पुस्तकाचे प्रकाशन आयुक्त पाटील यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष अभय छाजेड, उपाध्यक्ष इंद्रकुमार छाजेड, संस्थेचे सचिव जितेंद्र पितळिया, संचालक व आर्किटेक्ट विकास भंडारी, प्राचार्य प्रसन्न देसाई, समन्वयक शेखर गरूड आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26430 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..