राज्याला न्या देण्याचे काम करणार - मुख्यमंत्री शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्याला न्या देण्याचे काम करणार - मुख्यमंत्री शिंदे
राज्याला न्या देण्याचे काम करणार - मुख्यमंत्री शिंदे

राज्याला न्या देण्याचे काम करणार - मुख्यमंत्री शिंदे

sakal_logo
By

राज्याला न्याय देण्याचे काम करणार : शिंदे
हडपसर, ता. ९ : ‘‘राज्यातील जनतेच्या आशीर्वादाने मला मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. राज्याला सुजलाम्-सुफलाम् करण्यासह सर्वसामान्यांच्या जीवनात चांगले दिवस आणण्याचे आणि त्यातून राज्याला न्याय देण्याचे काम करणार आहे,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे प्रथमच शनिवारी शहरात आले होते. हडपसर येथे त्यांचा माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे यांच्यावतीने उद्योजक बाळासाहेब भानगिरे यांच्या हस्ते विठ्ठलमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी शिंदे बोलत होते. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, आरपीआय महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शशिकला वाघमारे, अजय भोसले, उल्हास तुपे, संतोष भानगिरे, सिध्दार्थ भानगिरे, विनोद शिंदे आदी उपस्थित होते.

शिंदे पुढे म्हणाले, ‘‘राज्यातील पन्नास आमदारांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची हिंदूत्वाबाबतची भूमिका स्वीकारली आहे. शिवाय आम्ही धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांची शिकवण पुढे घेऊन जात आहोत.’’ मी आज पंतप्रधानांसह केंद्रातील विविध नेत्यांना भेटून आलो आहे. राज्याच्या विकासासाठी केंद्रातून चांगले सहकार्य करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. सुरुवातीला प्रमोद भानगिरे व्यासपीठावर न दिसल्याने उपस्थितांमध्ये काही काळ चर्चा रंगली होती. मात्र, मुख्यमंत्री मार्गस्थ झाल्यावर थोड्या वेळाने ते कार्यक्रमस्थळी आले. आपण एका रूग्णवाहिकेला रस्ता दिल्यामुळे वाहतूक कोंडीत अडकून पडल्याचे त्यांनी सांगितले. सत्कारानंतर मुख्यमंत्री आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या महापूजेसाठी पंढरपूरकडे रवाना झाले.

2S76802

हडपसर : मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच पुणे शहरात आलेले एकनाथ शिंदे यांचा माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26470 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..