''अभिनव''च्या विद्यार्थ्यांकडून हरिनामाचा गजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''अभिनव''च्या विद्यार्थ्यांकडून हरिनामाचा गजर
''अभिनव''च्या विद्यार्थ्यांकडून हरिनामाचा गजर

''अभिनव''च्या विद्यार्थ्यांकडून हरिनामाचा गजर

sakal_logo
By

पुणे, ता. १० : आंबेगाव बुद्रुक येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजनेतील (एनएसएस) विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त शालेय परिसरामध्ये वृक्षदिंडी काढण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी हरिनामाचा गजर केला. दिंडीची सुरुवात प्राचार्या वर्षा शर्मा यांच्या हस्ते माउलींच्या पादुकांचे पूजन करून करण्यात आली. पालखी सोहळ्याला एनएसएस कॅप्टन अनुष्का परदेशी, राज घाडगे, साक्षी वेदपाठक, भाग्यश्री तिवारी उपस्थित होते. उपक्रमासाठी कार्यक्रम अधिकारी विनोदकुमार बंगाळे यांचे मार्गदर्शन लाभले.

हुजूरपागा गर्ल्स इंग्लिश स्कूलमध्ये ग्रंथदिंडी
पुणे : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या हुजूरपागा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल प्री प्रायमरी कात्रज विभागामध्ये पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. आषाढी एकादशीचे निमित्त पालखी सोहळ्याचे औचित्य साधून ग्रंथदिंडीचा जयघोष झाला. दोन वर्षांनी झालेल्या ग्रंथदिंडीमध्ये विठ्ठल रखुमाई समवेत छोट्या वारकऱ्यांची दिंडी निघाली होती. प्री प्रायमरी शाळेच्या समन्वयक अर्पिता कुलकर्णी यांनी बाल कथांच्या पुस्तकाची पूजा केली. सहशिक्षिका दिप्ती कुलकर्णी यांनी पालखी विषयी माहिती सांगितली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26567 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top