तृतीयपंथीयासह ११ जणांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तृतीयपंथीयासह ११ जणांवर गुन्हा
तृतीयपंथीयासह ११ जणांवर गुन्हा

तृतीयपंथीयासह ११ जणांवर गुन्हा

sakal_logo
By

पुणे, ता. १० : ध्वनिचित्रफीतीद्वारे अंधश्रद्धा पसरवीत असल्याचे वृत्त यूट्युबवर प्रसारित केल्याच्या रागातून एका महिलेस तृतीयपंथीय व त्याच्यासमवेतच्या महिलांनी जबर मारहाण केली. संबंधित महिलेस डांबून ठेवत तिच्या गळ्यात चपलांचा हार घालून तिला माफी मागण्यास लावल्याचा व्हिडिओही संबंधित व्यक्तीने प्रसारित करून महिलेची बदनामी केली. ही घटना विश्रांतवाडी परिसरात २३ जून रोजी घडली आहे. याप्रकरणी तृतीयपंथीयासह अकरा जणांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर पोपट शिंदे ऊर्फ शिवलक्ष्मी संजय झाल्टे यांच्यासह बारा जणांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ४० वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी महिला या मूळच्या बारामती येथील असून त्या समाजमाध्यमावर वृत्तवाहिनी चालवितात. तर संशयित आरोपी शिंदे हा तृतीयपंथी असून तो देखील समाजमाध्यमावर एक वृत्तवाहिनी चालवितो. दरम्यान, शिंदे याने अंधश्रद्धा पसरविण्यासाठीचा एक व्हिडिओ प्रसारित केला होता. हा प्रकार फिर्यादी महिलेच्या लक्षात आला. त्यानंतर तिने शिंदे अंधश्रद्धा पसरवीत असल्याचा व्हिडिओ तिच्या यूट्युब वाहिनीवर प्रसारित केली होती. या घटनेनंतर शिंदे व फिर्यादीचे वाद झाले होते. त्यावेळी फिर्यादी महिलेने त्याची माफी मागितली होती. त्यानंतर त्याने फिर्यादी महिलेस पुन्हा एकदा माफी मागण्यासाठी विश्रांतवाडी येथील चौधरीनगर भागात बोलावून घेतले होते. तेथेच त्याने फिर्यादी महिलेस एका इमारतीच्या छतावर डांबून ठेवत तिला मारहाण केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26605 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top