राज्यात दलित पँथरसारख्या चळवळीची गरज : लक्ष्मीकांत देशमुख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात दलित पँथरसारख्या चळवळीची गरज : लक्ष्मीकांत देशमुख
राज्यात दलित पँथरसारख्या चळवळीची गरज : लक्ष्मीकांत देशमुख

राज्यात दलित पँथरसारख्या चळवळीची गरज : लक्ष्मीकांत देशमुख

sakal_logo
By

पुणे, ता. १० : ‘‘महाराष्ट्राने फुले, शाहू, आंबेडकर यांसह देशाला अनेक महापुरुष दिले. पुरोगामी विचार दिला. दलित पँथर दिली. त्याच महाराष्ट्रात दलितांवर अन्याय-अत्याचार होत आहेत. त्याला रोखण्यासाठी दलित पँथरसारख्या चळवळीची गरज आहे,’’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त समाजात कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी देशमुख बोलत होते. या सोहळ्यास माजी मंत्री रमेश बागवे ,राहुल डंबाळे, सुवर्णा डंबाळे, अविचल धीवार, रुग्ण हक्क परिषदेचे उमेश चव्हाण आदी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, ‘‘अन्याय-अत्याचार झाले की त्याला न्याय देण्याचे आणि वाचा फोडण्याचे काम पँथर करायची. दलित पँथरचा तो झंझावात म्हणजे एक क्रांतिपर्व होता. याचा आदर्श घेऊन गुजरात, उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यात चळवळी व नेतृत्व तयार होत आहे. पण, ज्या महाराष्ट्राने पँथर निर्माण केली, तिथे पुन्हा पँथरची गरज आहे.”
या वेळी रमेश बागवे मनोगत व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26638 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top