गृहप्रकल्पात आढळला कामगाराचा मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गृहप्रकल्पात आढळला कामगाराचा मृतदेह
गृहप्रकल्पात आढळला कामगाराचा मृतदेह

गृहप्रकल्पात आढळला कामगाराचा मृतदेह

sakal_logo
By

पुणे, ता. १० : सहकारनगर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका गृहप्रकल्पात रविवारी दुपारी एका कामगाराचा मृतदेह आढळून आला. अग्निशामक दलाने मृतदेह बाहेर काढून तो ससून रुग्णालयात पुढील प्रक्रियेसाठी पाठविला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
राम बाबू तिलकराम (रा. बिहार) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. सहकारनगर परिसरामध्ये कोहिनूर सोसायटीत स्वरांजली नावाच्या गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. संबंधित गृहप्रकल्पाजवळच कामगारांची वसाहत आहे. या वसाहतीमध्येच मागील काही दिवसांपासून तो वास्तव्यास होता. शनिवारी रात्री तिलकरामने मद्यप्राशन केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. दरम्यान, रविवारी दुपारी संबंधित बांधकाम प्रकल्पाच्या ठेकेदाराला तिलकरामचा मृतदेह निदर्शनास आला. त्यानंतर त्याने याबाबत दत्तवाडी पोलिसांना खबर दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26705 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..