भरधाव वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भरधाव वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यु
भरधाव वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यु

भरधाव वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यु

sakal_logo
By

पुणे, ता. १० ः भरधाव वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू झाली. ही घटना शुक्रवारी पहाटे पावणेदोन वाजण्याच्या सुमारास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात घडली.
अपघातात मृत्यू झालेल्या पादचाऱ्याची अद्याप ओळख पटलेली नाही. याप्रकरणी पोलिस कर्मचारी राजू भिसे यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरुन अनोळखी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पादचारी शुक्रवारी पहाटे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकातून पाषाण रस्त्याकडे जात होता. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनाने त्यास जोरात धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वाहनचालक पोलिसांना माहिती न देता तेथून पसार झाला. पादचाऱ्याची अद्याप ओळख पटलेली नसून त्याचे वय अंदाजे ४० आहे. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26713 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top